शुक्रवार, २९ जानेवारी, २०१६
मन माझे निरंतर राहो तुमचे चरणी ।
नोहे याविण आणिक काही जीवनी ।।
जन्मभर श्रद्धा राहावी तुमचे ठायी ।
जैसे दुधात लोणी तैसे तुम्ही मज हृदयी ।।
नको संपत्ती सोहळा आणि किर्ती ।
मज हृदयी अखंड रहावी गुरुमूर्ती ।।
हा भाव माझा असे साधा भोळा ।
रात्रंदिन गुरुमूर्ती पहातसे डोळा ।।
जपतो अनिल गुरुमंत्र वेळोवेळा ।।
******************************************
वरील कविता गुरुवर्य बाबांच्या कृपेने सुचली आहे.
कवितेतील विशेषता पाहण्यासाठी प्रत्येक ओळीतील
पहिले अक्षर वरून खाली वाचत या.
सदगुरू कृपांकित - श्री अनिल तापकीर  


सोमवार, २७ एप्रिल, २०१५

'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 'ॐ गं गणपतेय नम: ।। ।। 

शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०१४


परब्रम्ह साजिरे देखिले आज ।
सजविले तयासी चढवुनी साज ।।
रूप सुकुमार सुंदर राजस ।
त्याच्या भक्तीचा मजला ध्यास ।।
उजळे तयाच्या तेजे नभांगण ।
आनिल चरणी घेई लोटांगण ।।

शुक्रवार, ६ जून, २०१४

मंत्रयोग - जपयोग
शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे. कुठल्याही शब्दाचे किंवा मंत्राचे वारंवार उच्चारण करणे किंवा मनातल्या मनात वारंवार घोकणे याला जपयोग म्हणतात.
याला मंत्रयोग देखील म्हटले जाते. मंत्राचा अर्थ आहे मनाला एका तंत्रात बांधणे. आणि ज्यावेळी मन एका तंत्रात एका नियमात बांधले जाते तेव्हा ती व्यक्ती मनाने    खूप सामर्थ्यशाली बनते. कारण नेमाला खूप महत्व आहे माऊलींनी एका ठिकाणी म्हटले आहे कि, ।। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ ।।   जपयोग हि साधना खूप पुरातन आहे.   म्हणूनच सर्व धर्मामध्ये या योगाचे अनुसरण करतात. हा एक चमत्कारी योग आहे. याचा प्रभाव व्यक्तीच्या मनावर व मस्तकावर जबरदस्त पडतो. जप योगामुळे सर्व प्रकारचे रोग आणि दु:ख  यातना संपतात.
जपयोगाचे चार  प्रकार आहेत १ - वैखरी  -  आपल्या वाणीने स्पष्ट व  मोठ्याने करतात तो वैखरी जप होय.  
२- मध्यमा - या मध्ये ओठातल्या ओठात जप केला  जातो.
३- पश्यंती - या मध्ये मनातल्या मनात केला जातो यामध्ये ओठ हलत नाही.
४- परा - यामध्ये जप करायचा नसतो तो आपोआप होतो.
पहिल्या तीन प्रकारामध्ये जप प्रयन्त पूर्वक करायचा असतो. चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते.
दु:ख- शोक दूर कसे होतात - ज्यावेळी व्यक्ती खूप काळजीत तणावात चिंतेत असते . त्यावेळी ती नकारात्मक विचारांनी घेरली जाते. आणि पहिल्यापेक्षा जास्त संकटात आणि दु:खात पडते. विचार करून करून हैराण होते. सर्वप्रथम या सर्व विचारातून सुटण्यासाठी मन एकाग्र झाले पाहिजे कुठल्याही देवतेच्या सततच्या मंत्र जपाने मन एकाग्र व्हायला लागते आणि मनामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण व्हायला लागते. आणि तुमच्या सर्व दुःखाचा हळू हळू विनाश व्हायला सुरुवात होते. काही दिवसातच तुम्ही एक आनंदी आणि सामर्थ्यशाली होता.
आपल्या आराध्य देवतेच्या निरंतर  जपाने  मनुष्य त्या दैवी शक्तीशी जोडला जातो आणि त्या दैवी शक्तीकडून त्याला सर्व प्रकारचे सहाय्य प्राप्त होते. जप योगामुळे दिव्य दृष्टी प्राप्त होते. आणि तो सामर्थ्यशाली तर होतोच पण अंतर्ज्ञानी देखील बनतो.
जपयोगाच्या चमत्काराविषयी सर्व धर्म ग्रंथामध्ये उल्लेख आलेले आहेत. वेदांमध्ये विविध प्रकारच्या मंत्रांचा उल्लेख केलेला आहे. देवतेच्या नाम मंत्रामध्ये खूप शक्ती असते. त्याचा जप केला कि साधारण मनुष्य देखील दैवी शक्ती प्राप्त होऊन सामर्थ्यशाली होतो मंत्रजपाने जे ध्वनी तरंग उठतात त्याने त्या व्यक्तीचे स्थूल व सूक्ष्म अशी दोन्ही शरीरे कंपित होतात. यालाच मंत्रयोग - जपयोग  म्हणतात.                  

सोमवार, ५ मे, २०१४

भगवंताचा ध्वनिरूप अवतार ‘नामस्मरण’

तारीख: 15 Nov 2013 15:07:43

undefinedनामस्मरणाने ‘गुप्त’ असणार्‍या भगवंताला अगदी सहज शोधून काढता येते. आपले घर सोडून कुठेही जंगलात, एकांत जागी, हिमालयात जावे लागत नाही. ‘ठायेचि बैसोनि करा एकत्रित
|’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची अनुभूती घेता येते. हा अभंग मात्र आचरणात आणावा लागतो. ध्रुवबाळ, भक्त प्रल्हाद, संत नामदेव, मीराबाई, गोराकुंभार, सावतामाळी, चोखोबा, रामदासस्वामी, तुकाराम महाराज आणि अगदी अलीकडील संत गोंदवलेकर महाराज या सर्व संतांनी हाच मार्ग चोखाळला आहे. भगवंताला शोधून काढणारी हीच मंडळी आपल्यालाही ‘नामस्मरण करा!’ अशी शिकवण देत असली, तरी आम्ही मात्र ‘नामस्मरण’ सोडून इतर सर्व करीत राहतो. इथेच आमची अध्यात्मातील गाडी अडून बसते. यातून मार्ग काढण्यासाठीच हा लेखन प्रपंच!
अध्यात्मातील सिद्धांतानुसार शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि शक्ती या सर्वांचा भगवंताच्या नामाशी थेट संबंध असतो, म्हणूनच जेथे भगवंताचे ‘नाम’ आहे तिथे या सर्वांची अनुभूती येतेच. सर्व संतांनी याच न्यायाने नामस्मरणातून भगवंताला प्रकट केलेले आहे. भगवंताचे नाम स्वयंभू आहे.
 भगवंताच्या नामातच त्याची सर्व शक्ती नित्य वास करीत असते हेच आपण विसरून जातो; म्हणून आपण ‘नाम’ घेत नाही. रोजच्या जीवनातील ७०% वेळ आपण फालतू वाया घालवत असतो. हाच वेळ नामस्मरणाला दिल्या गेला, तर आपण स्वत:च ‘संत’ झाल्याशिवाय राहत नाही.
 मनुष्ययोनीतच साधू, महंत, संत, गुरू, सद्‌गुरू, परात्परगुरू असा प्रवास करता येऊन, मानव परब्रह्मापाशी (श्रीकृष्ण रूपाशी) थेट जाऊन पोहोचू शकतो; म्हणूनच स्वर्गातील देवांनाही मनुष्याचा सारखा ‘हेवा’ वाटत असून, या देवताच मनुष्याच्या साधनामार्गात अडथळे आणत असतात. अज्ञानामुळे आपण म्हणतो की, ‘देव परीक्षा घेतो.’ स्वर्गातील देवता या साधनेसाठी मनुष्याला रोखण्याचा प्रयत्न करीत असतात; म्हणूनच खर्‍या साधकाच्या मार्गात अनेक विघ्ने येतात. ध्रुवबाळाच्या साधनेतील सर्व अडथळे हा याचा पुरावाच आहे. दुसरे उदा. भक्त प्रल्हादाचे आहे.
 आपल्या कर्माचा देवाण-घेवाण हिशोब, (संचित व प्रारब्ध) पूर्ण होणे, आपला देहाभिमान नष्ट होणे आणि सर्वात महत्त्वाचा आपला ‘अहंकार’ संपूर्णपणे नष्ट झाल्याशिवाय कितीही प्रयत्न केले, साधना केली, तरीही परमेश्‍वरापर्यंत पोहोचताच येत नाही. हे एक वर्म, तर ‘गुरुकृपेविण काहीच नोहे
|’ हे दुसरे वर्म लक्षात आले की, नामाच्या गाडीत बसून ईश्‍वराचे स्टेशन गाठता येते. आपण जिंकतो...
भगवंताच्या नामाचा महिमा
 भगवंताच्या नामाचा महिमा अनादी, अनंत आणि अगाध असून शृती, स्मृती व पुराणे यातून तो वर्णिला आहे. नामस्मरण हा अनादी असा वैदिक धर्म आहे. वेदांनी नाममहात्म्य कथन केले; म्हणून नामस्मरणाला धर्म म्हटले आहे. फार पूर्वी म्हणजेच सत्ययुगी सृष्टीच्या आरंभी हा नामस्मरणरूपी धर्म प्रकट झाला. त्यानंतर इतर युगात इतर धर्म, कार्ये (यज्ञ, याग, पूजा वगैरे) मागाहून प्रकटलेत.
 ज्या प्रमाणे कोणत्याही औषधाने गुण येईनासा झाला की, फक्त अमृतच उपयोगी पडते. त्याप्रमाणे या घोर कलियुगात लोकांच्या उद्धारार्थ फक्त एक नामस्मरणच उपयोगी पडते; म्हणूनच सर्व संत ओरडून, तळमळीने आपणा सर्वांना रोज सांगत आहेत की, रोज थोडातरी वेळ नामस्मरणात घालवा. ‘हरिपाठ’ हे नामाचे महत्त्व विशद करणारे रामबाण असे औषध आहे. नामस्मरण ही साधना सर्वात सोपी आहे. सर्व वर्ण, जाती, पंथ, धर्माच्या लोकांसाठी खुली आहे.
 भगवंताचे नामस्मरण केव्हाही, कुठेही, कसेही व कोणत्याही बंधनात न अडकता, पाहिजे तेव्हा करता येण्यासारखे साधन आहे; म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात की, ‘नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची
|’ईश्‍वर जसा सदा सर्वकाळ आहेच अगदी तसेच त्याचे नामही सर्वत्र आहेच. नामस्मरण हा भगवंताचा ‘ध्वनिरूप’ अवतारच आहे; म्हणून नामस्मरणाची अखंड चालणारी प्रक्रिया साध्य होते. या साधनेत शरीराला कुठलेच कष्ट पडत नाहीत. नुसते वाणीने उच्चारले, तरी आपले काम होते. यासाठी वेगळा वेळही काढायची मुळीच गरज भासत नाही. सर्व कामे-धंदा करता करताही नाम घेता येते. आपण संसारात रात्रंदिवस कष्ट करतो. तेवढेच कष्ट जर नाम घेण्यासाठी केले, तर सर्व काही साधले म्हणून समजा!
 नामस्मरणाचे सामर्थ्य ओळखा
 भगवंताचे नाम चारही पुरुषार्थांची प्राप्ती करून देणारे असेच आहे. कोणतीही मदत न घेता, एकटे हरिनाम बसल्या जागीच सर्वकाही मिळवून देते. सगुण भक्तीच्या नामातूनच निर्गुणाची गोडी उत्पन्न होत जाते. नामस्मरण करीत केलेले सर्व कर्म ‘अकर्म’ होते; म्हणजेच त्याचे फळ तयार होत नाही. एरवी कोणतेही कर्म करताच त्याचे, पाप किंवा पुण्य असे फळ निर्माण होत असते.
 नामधारकाच्या कुळाला यमधर्माचा स्पर्श होऊच शकत नाही; म्हणूनच भक्त प्रल्हाद मरणाच्या प्रत्येक दाढेतून सुखरूप बाहेर पडत असे! नामाने भगवंताचे सगुण रूप आपल्या समोर साकारू लागले की, ‘नाम’ साधना सिद्ध झाली असे समजावे. खूप नामस्मरण झाले की, परमेश्‍वराला आपल्या भक्तासामेर सगुण रूप घेऊन प्रकट व्हावेच लागते; म्हणूनच दगडी खांबात विष्णूचा ‘नरसिंह अवतार’ प्रकट होऊ शकला. प्रल्हादाचे नाम सगुणातून निर्गुणापर्यंत पोहोचल्याची ती पोचपावती आहे.
 सद्य:स्थितीत हरविलेला परमात्मा त्याच्या या नामसाधनेतून शोधून काढता येतो. ध्रुवबाळाने याच नामसाधनेच्या क्रियेतून परमेश्‍वर शोधून काढला. अनेक संतांनी हाच प्रयोग करून ईश्‍वराचे दर्शन, सत्संग, सोबत यांचा अनुभव घेतलेला आहे. नामस्मरण साधल्याचे हेच पुरावे आहेत.
 आपण केलेली पापे आणि पुण्ये ही ज्याची त्याला भोगावीच लागतात. परंतु नामामध्येच फक्त पापांच्या राशी जाळून टाकणारी शक्ती आहे. ही शक्ती दुसर्‍या कोणत्याच साधनात नाही; म्हणूनच ‘नामसाधना सर्वश्रेष्ठ’ ठरते. सर्व संतांना हे आध्यात्मिक रहस्य माहिती असल्याने, ते सर्व या नामाचीच कास धरतात आणि आम्ही मात्र हे सोपे साधन सोडून देतो आणि पूजा, अर्चा, पाठ, पारायणे, यज्ञ, आरत्या, उपवास, अनुष्ठाने, स्तोत्रे भजने, धार्मिक ग्रंथांचे वाचन यातच अडकून बसतो. या सर्व साधनांपेक्षा हजारो पटीने फायदा करून देणारे ‘नाम’ मात्र आम्ही घेत नाही. मग ईश्‍वराने, तरी तुम्हाला का मदत करावी ?
 ‘नाम घेतला आणि वाया गेला’ असा मनुष्य दाखवून द्या! नामाने जळणार नाही, असे पापच मनुष्य करू शकत नाही. कसेही घेतलेल्या नामाचे सुद्धा फळ मिळतेच! ( पाप नाहीसे होणे) विस्तवावर जसा श्रद्धा असो वा नसो पाय पडताच चटका बसतोच अगदी तसेच नामस्मरणाचे तंत्र आहे; म्हणूनच वाल्याचा ‘वाल्मीकि ऋषी’ होऊ शकला. वाल्याने केलेली सर्व पापे नामाने धुऊन टाकलीत. नामसाधनेचे वेगळेच सामर्थ्य व फलप्राप्ती असल्याने, सर्व संतांनी नामस्मरणाचा गौरवच केलेला आहे.
 नामस्मरणाचे खास वैशिष्टय
 नामस्मरण दोन कामे करते. एक पापांचा नाश करते. दुसरे भगवंताची प्राप्ती करून देते. कितीही पापी जीव या नामाच्या प्रभावाने मोक्षाला जाऊ शकतो. याचा पुरावा ‘अजामिळ’ हा आहे. अंतकाळी एकदाच ‘नारायण’ हे नाम घेणारा हा पापी अजामिळ त्या क्षणी उद्धरिला ! भगवंताची प्राप्ती होण्यासाठी त्याच्या नामासह त्याच्या रूपाचे ध्यान घडलेच पाहिजे. एकाच जन्मात भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर सर्व इंद्रिये, मन, बुद्धी यांचे नियमन करून, कोणतेही पाप न करता, भगवंताच्या ध्यानासह नाम घ्यावे लागते, तरच हे साध्य होते. अन्यथा, प्राप्ती होत नाही. पापे मात्र जळतीलच! म्हणूनच ‘नामाचे दहा अपराध’ ओळखूनच नाम घेतल्यास नामाची सिद्धता लवकर होते. हनुमंताचे नामस्मरण हे ‘सिद्ध’ झाले होते; म्हणून तो सर्वत्र विजयी होत असे.
 नाम घेत असताना त्या देवतेचे रूप डोळ्यासमोर येणे यालाच ‘सगुणध्यान’ असे म्हणतात. सर्वच संत आपल्या भक्तांना सगुण भक्तीकडे नेत असतात. मात्र, त्यातील काही भक्तांनाच निर्गुण भक्तीकडे वळवितात. कारण ज्या भक्तांची सर्व पापे नाश पावलेली असतात असेच भक्त ईश्‍वराच्या निर्गुण रूपाकडे वाटचाल करू शकतात; म्हणून ‘निर्गुण भक्ती’ साधकाला कठीण वाटत असते. ‘सगुण ध्यान’ होण्यासाठी फोटोसमोर बसूनच नाम घ्यावे, म्हणूनच भगवंताच्या प्रतिमेची, फोटोची निर्मिती झाली आहे. भक्तांच्या मनातील आपले ‘रूप’ ओळखून निर्गुण, निराकार असलेला परमात्मा आपल्या भक्तांसमोर त्या रूपात सगुण रूपाने प्रकटतो; म्हणूनही तो साकार आहे.
 नामस्मरणाचे तिसरे वैशिष्ट्य असे की, आपला पुण्यसंचय वाढत जातो. त्यातूनच ईश्‍वरप्राप्तीची गोडी उत्पन्न होत जाते. संत ज्ञानेश्‍वर महाराज हरिपाठात म्हणूनच सांगतात की,
 ‘हरि मुखे म्हणा
 हरि मुखे म्हणा|
पुण्याची गणना
 कोण करी ॥
 असे हे नामस्मरण भक्तीच्या प्रांगणात सर्वात वरचढ ठरते. गीतेमध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, ‘यज्ञानां जपयज्ञोऽस्मि
|’ कलियुगात यज्ञच करायचा आहे, तर तो अखंड नामजपाचा कर! पण आम्ही नुसती गीता वाचतो आणि नामाचे हे महत्त्व पार विसरून जातो. नामस्मरणाने परमसिद्धी साधते. सर्व सिद्धी प्राप्त होतात. ‘सर्व जाणीव, जाणीवरहित होणे’ यालाच अध्यात्मात संतांनी परमसिद्धी असे म्हटले आहे.
नामस्मरणाने उद्धरलेले भक्त
 नामस्मरण साधनेमुळे सर्वच युगात अनेक भक्त, संत, महंत उद्धरून गेल्याचे दाखले आहेत. सर्वात महत्त्वाचे उदाहरण म्हणजे ‘नारद’ होय. भक्त प्रल्हाद, राजा अंबरीष, रुक्मानंद, बिभीषण, हनुमान, अंगद, भरत, उद्धव, अर्जुन, अक्रूर, तर कलियुगात संत ज्ञानेश्‍वर, जनाबाई, मीराबाई, समर्थ रामदास, संत तुकाराम, चोखोबा, सावतामाळी, गोराकुंभार, एकनाथ महाराज, संत नामदेव, संत गोंदवलेकर महाराज, साईबाबा, गजानन महाराज आदी सर्व उदाहरणे आपल्या समोर आहेतच!
 भक्त आणि अवतार
 भक्त आणि अवतार यात फरक असतो. भक्त हा ईश्‍वराशी एकरूप झालेला असतो,तर अवतार हा ईश्‍वराच्या आज्ञेवरून विशिष्ट कार्यासाठी पृथ्वीवर येतो व आपले कार्य ज्ञाल्यावर पुन्हा ईश्‍वरात विलीन होतो;म्हणून प्रत्येक अवताराला समाप्तीचा नियम लागू आहे. फक्त दत्तावतारच याला अपवाद आहे. कारण या अवताराला समाप्ती नाही. ब्रह्मांडाच्या अंतापर्यंत हा अवतार कार्यरतच राहणार आहे. कारण सर्व जिवांना मुक्ती मिळेपर्यंत या अवताराची समाप्ती होणार नाही. हा नित्य कार्यरतच असेल. त्याचेच नाव दत्तगुरू असे आहे.
 भाविक, भक्तांनो, नामस्मरणाचे महत्त्व ओळखा, खूप-खूप नाम घ्या... म्हणजे धरणीमाता पावन होऊन जाईल. धरतीवरच स्वर्ग अवतरेल! मग कसले बॉंम्बस्फोट, कसला भ्र्रष्टाचार, कसले बलात्कार, कसला अन्याय अन् अत्याचार, कसला जातीयवाद... या सर्वांवर एकच रामबाण औषध आहे- ‘नामस्मरण साधना.’ सर्व राज्यकर्तेच बदलून टाकण्याची शक्ती, सामर्थ्य नामधारकाचे ठिकाणी आपोआपच येते; म्हणून उठा! दिवसभरात जास्तीत जास्त वेळ ‘नाम’ घ्या. म्हणूनच सांगावेसे वाटते की, नामस्मरणाची कास धरा
|भारतभूमीचा उद्धार करा ॥ सनातन हिंदू धर्म की जय |
प्रा. श्रीकांत भट
 अकोला
तुकाराम महाराज संक्षिप्त चरित्र
श्रीधर देहूकर ( १९१६-२००४)
ये तु धर्म्यामृतमिदम्” गीता १२.२०
ते हे गोष्टी रम्य । अमृतधाराधर्म्य ।
करिती प्रतीति गम्य । ऐकोनि जे ॥ ” ज्ञानदेवी १२.२३०
 
देवाच्या चरित्राला परमामृत म्हटले जाते आणि भक्ताच्या चरित्राला धर्म्यामृत म्हटले जातेदेवाची चरित्रे संतांनी गायिलीसांगितली पण संतांची चरित्रे आम्ही सांगणे हे कठीण काम आहेकारण संत जसे असतात तसे दिसत नाहीत आणि जसे दिसतात तसे असत नाहीतशिवाय आमची जी शब्दसृष्टी आहेतीही मर्यादित आहे.
आमुते करावया गोठी  ते झालीच नाही वाग्सृष्टि  आम्हालागी दिठी  ते दिठीचनोहे  (अमृतानुभव)
आपण जर त्यांना विचारालआपण कोणकोठलेकोठून आलातकोठे जावयाचेआपल नाव कायरूप कायतर ते सांगतील  काही नाही .
काहीच मी नव्हे कोणिये गावीचा । येकटु ठायीच्या ठायी एकु ॥१॥
नाही जात कोठे येत फिरोनिया । अवघेचि वायावीण बोल ॥२॥
तुका म्हणे नाव रूप नाही आम्हा । वेगळा त्या कर्मा अकर्माशी ॥३॥
अशा परिस्थितीत तुकोबांचे (तुकाराम महाराज) चरित्राचा अल्प भाग देण्याचा प्रयत्‍न आम्ही करीत आहोत.
अनुक्रमणिका

जन्म व पूर्वज      

राजकीयधार्मिक आणि सामाजिक स्थिती  
प्रेमळ मातापित्यांचा वियोग
साक्षात्कार
कवित्वाची स्फूर्ती आणि जलदिव्य
तुकोबा आणि दोन संन्याशी
७. धरणेकरी
८. छत्रपती शिवाजी आणि तुकोबा
९. तुकोबांचा बोध उपदेश शिकवण
१०.  तुकोबांचे ध्रृपदेटाळकरीअनुयायी व शिष्य
११. प्रयाण
११. तुकोबांच्या पश्चात्‌

जन्म व पूर्वज

धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव । तेथे नांदे देव पांडुरंग ॥१॥
 तुकोबांची जन्मभूमीकर्मभूमी असलेले देहू गाव पुण्यभूमी आहेदेहू गावाला धन्यत्व-पुण्यत्व आले ते तेथे नांदत असलेल्या पांडुरंग देवतेमुळेहे जागृत स्थान आहे.
इंद्रायणी नदीच्या शोभायमान तीरावर पांडुरंग देवाचे देवालय आहेकटेवर कर ठेवून विश्वाचा जनिता उभा आहेवामांगी माता रखुमाई आहेसमोर अश्वत्थ वृक्ष आहेपारावर गरुड हात जोडून उभा आहेद्वारात विघ्नराज आहेतबाहेर भैरव आणि हनुमानजी आहेतदक्षिणेला हरेश्वराचे देवालय आहेजवळच बल्लाळाचे वन आहेत्यात सिध्देश्वराचे अधिष्ठान आहेक्षेत्रवासी धन्य होतेते दैववान आहेत,वाचेने देवाचा नामघोष करीत आहेततुकाराम तुकोबांचे वेळचें हे देहू गावचे वर्णन आहे.
तुकोबांपासून सुमारे तीनशे वर्षांपूर्वी तुकोबांचे पूर्वज विश्वंभरबाबा हे देहू गावी राहात होतेया घराण्याचे कुलदैवत विठोबा होतेघराण्यात आषाढी-कार्तिकीची वारी विश्वंभरबाबाचे वाडवडिलांपासून चालत आली होतीपंढरीची वारी वाडवडिलाप्रमाणे नियमाने चालविण्यास बाबांच्या मातोश्रीने विश्वंभरबाबांच्या या निकट सेवेने देव पंढरपुराहून देहूस धावत आलेजसे पुंडलीकरायाच्या निकट सेवेनें देव वैकुंठाहून पंढरपूरला धांवत आले.
पुंडलिकांचे निकट सेवे । कैसा धांवे बराडी ॥१॥
मूळ पुरुष विश्वंभर । विठ्ठलाचा भक्त थोर ॥१॥
त्याचे भक्तीने पंढरी । सांडूनी आले देहू हरी ॥२॥
आषाढ शुध्द दशमीच्या दिवशी देवाने विश्वंभरबाबांना स्वप्नात भेट देऊन मी तुमचे गावी आलो असल्याचे सांगून देव आंबीयाचे वनात निद्रिस्त झालेसकाळी विश्वंभरबाबा गावकऱ्यांचे समवेत आंबीयाचे वनात गेलेतेथे त्यांना श्री विठ्ठल रखुमाईच्या स्वयंभू मूर्ती मिळाल्यामूर्तीची स्थापना बाबांनी आपल्या वाडयांतील देवघरात केलीपंचक्रोशीतील लोकही दर्शनास येऊ लागलेदेवाचा प्रतिवर्षी महोत्सव होऊ लागलामहोत्सवाचे खर्चाकरिता शेत इनाम मिळालेशुध्द एकादशीस वारी भरू लागलीविश्वंभरबाबाचा काळ झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव हरी आणि मुकुंद देवाची सेवा सोडून मूळच्या क्षात्र वृत्तीकडे वळलेकुटुंबियांना घेऊन राजाश्रयास गेले.तेथे त्यांना सैन्यामध्ये अधिकाराच्या जागा मिळाल्यात्यांचे हे कृत्य त्यांच्या आई आमाबाई यांना आवडले नाहीदेवालाही पसंत पडले नाहीदेवांनी आमाबाईंना स्वप्नात येऊन सांगितले कीतुमच्याकरिता मी पंढरपूर सोडून देहूस आलो आणि तुम्ही मला सोडून येथे राजाश्रयास आलात हे बरे नव्हेतुम्ही देहूला परत चला.आमाबाईंनी मुलांना स्वप्नातील वृत्तांत निवेदन केला व देहूस परत जाण्याबद्दल परोपरीने सांगितलेमुलांनीं त्याकडे मुळीच लक्ष दिले नाहीपुढे लवकरच राज्यावर परचक्र आलेउभयता बंधू रणांगणावर शत्रूशी लढता लढता धारातीर्थी पडले.मुकुंदाची पत्‍नी सती गेलीहरिची पत्‍नी गरोदर होतीतिला घेऊन आमाबाई देहूस आल्यासुनेला माहेरी बाळंतपणाकरिता पाठविले आणि आपण देवाची सेवा करू लागल्याहरिच्या पत्‍नीला मुलगा झाला त्याचे नाव विठ्ठल ठेवलेविठ्ठलाचा पुत्र पदाजीपदाजीचा शंकरशंकराचा पुत्र कान्होबा आणि कान्होबाचे बोल्होबाबोल्होबा यांना पुत्र तीनवडील सावजीमधले तुकाराम आणि धाकटे कान्होबाराय.
    तुकोबांचा ज्या कुळात जन्म झाला ते कुळ पवित्र होते.
पवित्र ते कुळ पावन तो देश । जेथे हरीचे दास जन्म घेती ॥१॥
  ते कूळ क्षत्रियाचे होतेपूर्वजांनी रणांगणावर शत्रूशी लढता लढता देह ठेवले होतेघराणे सुसंस्कृत होतेधार्मिक होतेघरात पिढयान् पिढया विठ्ठलाची उपासना चालू होतीपंढरीची वारी होतीमहाजनकीचे वतन होतेशेतीवाडी होतीसाव-सावकारकीव्यापारधंदा होतादोन वाडे होतेएक राहण्याचा व दुसरा बाजारपेठेतील महाजनकीचागावात चांगली मानमान्यता होतीपंचक्रोशीत प्रतिष्ठा होतीशेती करीत होते म्हणून त्यांना कुणबी म्हणतव्यापार धंदा करीत होते म्हणून वाणी म्हणतआणि तुकोबांनी या सगळयांचीच उपेक्षा केली म्हणून त्यांना गोसावी म्हणू लागले.
गोसावी हे काही या कुळाचे आडनाव नव्हेआडनाव मोरेआणि गोसावी ही पदवी(इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी गीता काली वैश्याची गणना शूद्रांत होऊ लागली होती.
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेपि यांति परां गतिम् ॥ गीता  ९.३२
श्रीज्ञानदेव तुकोबांच्या काळात क्षत्रियांचीही गणना शूद्रात होऊ लागली.
तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया । कां शूद्र अंत्यजादि इया ॥ ज्ञानेदेवी ९४६०.
दोनच वर्ण राहिले होतेब्राह्मण आणि शूद्र म्हणून तुकोबांना शूद्र म्हणू लागले.
राजकीयधार्मिक आणि सामाजिक स्थिती
दक्षिणेत त्यावेळी मुसलमानी सत्तेचा अंमल होतागोव्यात पोर्तुगीज होते.विजापूरची आदिलशाहीअहमदनगरची निजामशाहीगोवळकोंड्याची कुतुबशाही या राज्य करणाऱ्या तीन मुसलमानी सत्ता एकमेकांशी लढत होत्यागावे बेचिराख होत होतीलुटली जात होतीराजे विलासात दंग असतते प्रजेला पीडितब्राह्मणांनी आपले आचार सोडले होतेक्षत्रिय वैश्यांना नाडीत होतेसक्तीने धर्मांतर चालू होते.महाराजांनी म्हटले.
सांडिले आचार । द्विज चाहाड झाले चोर ॥
राजा प्रजा पिडी । क्षेत्री दुश्चितासी तोडी ॥
वैश्यशूद्रादिक । हे तो सहज नीच लोक ॥
वैश्य आणि शूद्र यांच्या संबंधी तर बोलावयास नकोधर्माचा लोप झाला होता.अधर्म माजला होता.

ऐसे अधर्माचे बळ । लोक झकविले सकळ ।।

लोक अधर्मालाच धर्म म्हणूं लागलेसंतांना मान राहिला नव्हता.
संतां नाही मान । देव मानी मुसलमान ॥१॥
समाज नाना देव-देवतांच्या मागें लागून विस्कळीत झाला होताधर्मात आकर्षण राहिले नव्हतेअज्ञानाचा अंधकार पसरलेला होतालोक प्रकाश देणाऱ्या सूर्याच्या उदयाची वाट पाहात होतेअशा परिस्थितीत देहू गावी चित् सूर्यांचा उदय झाला.
संतगृह मेळी । जगत् अंध्या गिळी । पैल उदयाचळी । भानु तुका ॥३॥
  (रामेश्वरभट्ट अभंग)
महान भगवत् भक्त बोल्होबा आणि माता कनकाई यांचे उदरी शके १५३० ( ..१६०९ )मध्ये तुकोबांचा जन्म झालाघरची श्रीमंती असल्यामुळे बालपण मोठया कोडकौतुकात आणि खेळण्यात गेलप्राथमिक शिक्षण पंतोजीकडून मिळालेपंतोजी हातांत पाटी घेऊन मुलांचा हात धरून मुलांना शिकवीत.
अर्भकाचे साठी । पंते हाते धरिली पाटी ॥१॥
मुले खडे मांडून मुळाक्षरे काढीत.
ओनाम्याच्या काळे । खडे मांडियेले बाळे ॥१॥
व्यवहारचे आणि परमार्थाचे शिक्षण तुकोबांना वडील बोल्होबा यांचेकडून मिळाले.वडील बंधू सावजी यांनी धंदा-व्यापारात लक्ष घालण्याचे नाकारल्यावर बोल्होबांनी तुकोबांना धंदा-व्यापार,सावसावकारकी पाहाण्यास सांगितलीबाजारपेठेतील महाजनकीचे वाडयात बोल्होबांच्या हाताखाली काम करता-करता व्यवसायाचे धडे मिळत गेलेवयाचे तेराव्या वर्षी तुकोबांच्या गळ्यात संसार पडलातुकोबा लौकरच स्वतंत्रपणे व्यवसाय पाहू लागलेसावकारकीतव्यापारधंद्यांत तुकोबांनी चांगलाच जम बसविलालोकांकडून शाबासकी मिळू लागलीसर्वजण प्रशंसा करू लागले.राहात्या घरातील सोज्वळ सात्त्विक वातावरण तुकोबांनी बाजारपेठेतील-घरात-व्यवसायात आणलेतिन्ही भावांची लग्नकार्ये झालीतुकोबांची प्रथम पत्‍नी दम्याने नेहमी आजारी म्हणून तुकोबांचा दुसरा विवाह पुण्यांतील सुप्रसिध्द सावकार आप्पाजी गुळवे यांची कन्या सौजिजाबाई उर्फ आवली यांच्याशी झालाएका श्रीमंत घराण्याचा दुसऱ्या श्रीमंत घराण्याशी संबंध होताहे ऐहिक ऐश्वर्य पराकोटीला पोहोचलं होतंघरात धन-धान्य विपुल होतेप्रेमळ माता पितासज्जन बंधू,आरोग्यसंपन्न शरीर होतंकोणत्याही गोष्टीची काही उणीव नव्हती.
माता पिता बंधू सज्जन । घरीं उदंड धन धान्य ।
शरिरी आरोग्य लोकांत मान । एकहि उणे असेना ॥१॥
(महिपतीबाबा चरित्र)
हे सुखाचे समाधानाचे ऐश्वर्याचे दिवस केव्हा गेलेकसे गेले हे थोड-सुध्दा समजले नाहीया नंतर सुखापुढे येतसे दुःख। या भविष्याला सुरुवात झाली.
प्रेमळ मातापित्यांचा वियोग
        वयाच्या सतराव्या वर्षी कर्तबगार प्रेमळ पिताश्री बोल्होबा मृत्यू पावले.ज्यांनी तुकोबांना मिराशीचे धनी केले.
बाप करी जोडी लेकराचे ओढी । आपली करवंडी वाळवोनी ॥१॥
एकाएकीं केला मिराशीचा धनी । कडीये वाहुनि भार खांदी ॥२॥
      मिराशी-महाजनकी आणि देवाची सेवा.ज्यांच्यामुळे संसारतापाची झळ लागत नव्हतीतेच छत्र हारपले.
बाप मेला न कळता । नव्हती संसाराची चिंता ॥१॥
     (न कळता म्हणजे एकाकी माझे पश्चाततुकोबांना असह्य दुःख झालहे दुःख कोठे ओसरते न ओसरते तोच पुढील वर्षी प्रेमळ माता कनकाई तुकोबांच्या देखत मृत्यु पावल्या
माता मेली मज देखता ॥४॥
  तुकोबांवर दुःखाचा डोंगरच कोसळलामातेने तुकोबांकरिता काय केल नाही सर्व काही केल.
काय नाही माता गौरवीत बाळा । काय नाही लळा पाळीत ती ॥१॥
काय नाही त्याची करीते सेवा । काय नाही जीवा गोमटेते ॥२॥
अमंगळपणे कांटाळा न धरी । उचलोनि करी धरी कंठी ॥३॥
यापुढे वयाच्या अठराव्या वर्षी वडील बंधू सावजींची पत्‍नी निधन पावलीआधीच सावजीचे प्रपंचाकडे लक्ष नव्हतेत्यात पत्‍नीचा मृत्यूते घरदार सोडून तीर्थयात्रेला जे गेले ते गेलेचकुटुंबातील चार माणसांचा वियोग झालाज्या संसारात एकही उणे नव्हते त्यात आता एक एक उण होऊ लागलतुकोबांनी धीर खचू दिला नाही.औदासीन्य आवरून विसावे वर्षी प्रपंच नेटका करण्याची हाव धरलीपण हाय !एकविसाव्यात विपरीत काळ आलादक्षिणेत मोठा दुष्काळ पडलामहाभयंकर दुष्काळ होता तो१६२९ त (शके १५५०-५१पाऊस उशिरा पडलाशेवटी अती वृष्टीने पिके गेलीलोकांना अजून आशा होती.१६३० मध्ये पाऊस अजिबात पडला नाहीसर्वत्र हाहाकार उडालाधान्याचे भाव कडाडलेचाऱ्याच्या अभावी शेकडो गुरे मेलीअन्नावाचून शेकडो माणसे मेलीसधन कुटुंबे धुळीस मिळालीअजून दुर्दशा संपली नव्हती.१६३१ मध्ये त्या दैवी आपत्तीचा कडेलोट झालाअती वृष्टीमुळे पिके गेलीमहापुराने भयंकर नासाडी झालीहा दुष्काळ ही दैवी आपत्ती तीन वर्षे टिकलीदुष्काळाच्या ह्या चढत्या दुर्दशेसंबंधी महीपतीबाबा लिहितात -
ती पुढे बरग पडले कठीण । दो पायल्याची झाली धारण ।
पर्जन्य निःशेष गेला तेणे । चाऱ्यावीण बैल मेले ॥१॥
   पुढे दुष्काळाच स्वरुप भयंकरच वाढले.
महाकाळ पडीला पूर्ण । जाहाली धारण शेराची ।
ते ही न मिळे कोणा प्रती । प्राणी मृत्यूसदनी जाती ॥१॥
   पायलीभर रत्‍नास पायलीभर उडद मिळेनात.
दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान ।
   या दुष्काळामध्ये तुकोबांच्या प्रपंचाची संपूर्ण वाताहात झालीगुरे ढोरे मेली.साव-सावकारकी बुडालीव्यापार धंदा बसलालोकातील मानमान्यता गेलीप्रथम कुटुंब रखुमाबाई आणि एकुलता एक लाडका मुलगा संतोबा यांचा दुष्काळाने बळी घेतलासावकार आणि व्यापारी यांना दुष्काळी परिस्थिती म्हणजे सुवर्णसंधीकृत्रीम दुष्काळ टंचाई निर्माण करून शेकडो रुपयांचा फायदा उठविणारे महाभाग आपण हल्ली पाहातोच कीलोकांच्याकडील येण दुष्काळी परिस्थितीत वसूल करणारे तुकोबा कठोर हृदयाचे नव्हतेउलट आपली दुर्दशा आपत्ती दुःख विसरूनबाजूला ठेवून -दुष्काळात गांजलेल्या पीडलेल्या लोकांना तुकोबांनीं सढळ हाताने मदत केली.
सहज सरले होते काही । द्रव्य थोडे बहु ते ही ।
त्याग केला नाही । दिलें द्विजां याचकां ॥३॥
काही द्रव्य सहज सरून गेल होत आणि थोडबहुत जे राहिल होत ते ब्राह्मणांना,भिकाऱ्यांनागरजूंना सढळ हाताने दिलं. (यावरून तुकोबांचे दिवाळ निघाल होत असा शब्दशः अर्थ घ्यावयाचा नाही.)
संसाराच्या नावे घालोनिया शून्य । वाढता हा पुण्यधर्म केला ॥९॥
मायबापपुत्र कलत्रादि कौटुंबिकाचे मृत्युदुष्काळाने प्रपंचाची झालेली वाताहात,जनामधील दुर्दशासखे-सोयरे यांनी केलेली निंदानालस्तीया सर्व आपत्तींना तुकोबांनी धैर्याने तोंड दिलेते दुर्दशेला आपत्तीला सन्मुख झालेपळून गेले नाहीत.ते पलायनवादी नव्हतेत्यांना संसार जिंकावयाचा होताया रणांगणावर माघार घ्यावयाची नव्हतीया असारातून सार काढावयाचे होतेदुष्काळामुळेदैवी आपत्तीमुळेमानवी देहदेहसंबंधी माता,पिता, पुत्र आणि संपत्ति यांचे मूल्यमापन झाले होतेअशाश्वता पटली होतीते शाश्वत मूल्याचा शोध करूं लागलेआपण या उद्वेगातून पार कसे पडूपैलतीर कसे गाठूयाचा विचार करू लागले.

साक्षात्कार
विचारले आधी आपुले मानसी । वाचो येथे कैसी कोण्यापरी ॥१॥
ते सत्याच्या शोधार्थ निघालेत्या निश्चयाने ते भामनाथांच्या पर्वतावर गेले.चिरंतन सत्याचा साक्षात्कार झाला तरच परत फिरायच नाहीतर नाहीत्यांनी निर्वाण मांडलेतुकोबांच्या अंगावर मुंग्याविंचूसर्प चढलेते अंगाला झोंबले व पीडा देऊ लागलेवाघाने झेप घातलीमात्र तुकोबांचा निश्चय ढळला नाहीपंधराव्या दिवशी सत्याचा साक्षात्कार झाला.
भामगिरी पाठारी वस्ती जाण केली । वृत्ती स्थिरावली परब्रह्मी ॥१॥
सर्प विंचू व्याघ्र अंगाशी झोंबले । पिडू जे लागले सकळीक ॥२॥
पंधरा दिवसामाजी साक्षात्कार झाला । विठोबा भेटला निराकार ॥३॥
निराकार परमात्मा भेटलादेवाने भक्ताला चिरंजीव भव आशिर्वाद दिलादिलासा दिला.
तंव साह्य झाला हृदय निवासीं । बुध्दि दिली ऐशी नाश नाही ॥२॥
तुकोबांनी घर सोडल्यापासून तुकोबांचे धाकटे बंधू कान्होबा त्यांच्या शोधार्थ देहू गावचे परिसरातील डोंगरदऱ्या-खोऱ्याजंगले धुंडाळत होतेशोधता शोधता ते भामनाथ पर्वतावरील गुहेत येऊन पोहोचले आणि आश्चर्यचकित झालेकाय दृश्य त्यांना दिसल तुकोबांच्या अंगावर मुंगळेसर्पविंचू चढलेले आहेतवाघांनी झेप घेतलेली आहेपरमात्मा प्रगट झालेला आहेसोनियाचा दिवस तोकान्होबांच्या नेत्रांचे पारणे फिटलेजन्माचे सार्थक झालेउभयता बंधूंची भेट झालीज्या स्थळी देव तुकोबांना भेटलेत्या पवित्र स्थळाचे पावित्र्य आणि स्मृती अखंड राहण्याकरिता त्या ठिकाणी कान्होबांनी काही दगड रचलेत्या पवित्र भूमीला वंदन करून उभयता बंधू तेथून निघून सरळ इंद्रायणीच्या संगमावर आलेसंगमात स्नान करून पंधरा दिवसाच्या उपवासाचे पारणे सोडलेतुकोबांनी कान्होबांकडून खते पत्रे आणून घेतली.यांचे लोकांकडे जे येणे होते त्या त्या लोकांकडून लिहून घेतलेली खते होतीत्याच्या वाटण्या केल्यानिम्मी खते कान्होबाला दिली आणि स्वतःच्या वाटयाची निम्मी खते तुकोबांनी इंद्रायणीच्या डोहात बुडविलीया धनकोने ऋणकोकडून येण असलेल्या रकमा दुष्काळानंतर येनकेन प्रकारेण वसूल करून आपल्या विस्कटलेल्या संसाराची घडी बसविण्याऐवजी खते गंगार्पण करून ऋणकोंना कर्जमुक्त केले आणि आपण सावकारकीकडे पाठ फिरवून विन्मुख झाल्याचे जगाला दाखवून दिलयाला म्हणतात सच्चा समाजवाद.
देवाचे देऊळ होते जे भंगले । चित्ती ते आले करावे ते ॥१॥
जसे खते पत्रे इंद्रायणीच्या डोहांत बुडवून सावकारशाहीला विन्मुख झाल्याचे विलक्षण रीत्या दाखवून दिले तसेच दुष्काळानंतर भंगलेला संसार न सांधता,देवाच्या भंगलेल्या देवळाचा जीर्णोध्दार करून देवाला परमार्थाला सन्मुख झाल्याचे तुकोबांनी जग जाहीर केलेपिताश्री बोल्होबांच्या कारकिर्दीत वाढत्या यात्रेला देवघर अपुरे पडू लागले म्हणून इंद्रायणीच्या रम्य तीरावर बोल्होबांनी देवाचे देवालय बांधले व राहत्या वाडयाच्या देवघरातील मूर्तीची स्थापना या नव्या देवालयात केली.तुकोबांच्या वेळी देऊळ भंगले होतेम्हणून दुष्काळानंतर सर्वप्रथम तुकोबांनी देवालयाचा जीर्णोध्दार केला.
श्रीमूर्तींचे होते देवालय भंगले । पाहाता स्फुरले चित्ती ऐसे ॥१॥
म्हणे हे देवालय करावयाचे आता । करावया कथा जागरण ॥२॥
देवालयाचा जीर्णोध्दार केला तो देऊळ बांधण्याने होणाऱ्या पुण्यप्राप्‍तीरिता नव्हे तर भजनकीर्तनकथाजागरण करण्याकरिताहरीजागरणश्रवणकीर्तनमनन,सहज साक्षात्कार आणि मग पांडुरंग कृपा देवालयाने या अशक्य गोष्टीची सहज साध्यता-प्राप्‍ती झाली.

काही पाठ केली संतांची उत्तरे । विश्वासे आदरे करोनिया ॥१॥

कीर्तन करण्यास उभे राहण्याकरिता देवालय बांधलेआणि कीर्तन करण्यास लागणाऱ्या पाठ-पाठांतराकरिता तुकोबा रोज भंडारा डोंगरावर एकांतात जाऊन अभ्यास करूं लागलेप्रातःकाळी स्नान करून कूळ दैवत श्रीविठ्ठल-रखुमाई यांची स्वहस्ते पूजा अर्चा करावयाची व भंडारा डोंगर गाठावयाचा.
कीर्तन संपूर्ण यावयासी हाता । अभ्यास करिता झाला तुका ॥
अभ्यास तुकया करीतसे ऐसा । सरितासी जैसा पात्र सिंधु ॥६॥
तैसे जे ऐके ते राहे अंतरी । ग्रंथ याहीवरी वाचीयेले ॥
ज्ञानदेव महाराजांची - ज्ञानदेवीअमृतानुभवएकनाथ महाराजांची भागवतावरील टीकाभावार्थ रामायणस्वात्मानुभवनामदेवरायांचे अभंगकबीरांची पदे यांचे तुकोबांनी परीशीलन केलेज्ञानदेव  महाराजनाथ महाराजनामदेवराय आणि कबीर या थोर भक्तिमार्गीय संतांची काही वचने त्यांनी पाठ केली.
करू तैसे पाठांतर । करुणाकार भाषण ॥१॥
जिही केला मूर्तिमंत । ऐसा संतप्रसाद ॥२॥
निर्गुण निराकार परमात्म्याला ज्यांनी सगुण साकार केलाअमूर्ताला ज्यांनी मूर्तिमंत केला असा हा संत प्रसाद सेवन केलातुकोबांनी पुराणे पाहिलीशास्त्राचा धांडोळा घेतला.
पाहिलीं पुराणे । धांडोळिली दरूषणे ॥१॥
पुराणीचा इतिहास । गोड रस सेविला ॥१॥
 तुकोबांना हा एकांतवास फार आवडत असेया एकांतात त्यांना सखेसोयरे भेटले होतेअर्थात् ते एकांतांतील सख्यासोयऱ्यांपेक्षा निराळे होतेकोण होते ते ?वृक्ष होतेवेली होत्या वनचरे होतीपक्षीराज मधुरमंजुळ सुरात कुजन करीत होतेदेवाला आवळीत होते.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे । पक्षीये सुस्वरे आळविती ॥१॥
येणे सुखे रूचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥धृ

आकाश मंडप पृथिवी आसन । रमे तेथे मन क्रीडा करू ॥३॥
येणे सुखे रूचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥धृ

तुकोबांच्या पत्‍नी सौजिजाबाई रोज घरचा कामधंदा आटोपून स्वयंपाक उरकून तुकोबांचे जेवण घेऊन भंडाऱ्यावर जात असततुकोबांना जेऊ घातल्यानंतर आपण जेवत असततुकोबा परमार्थ साधनेत निमग्न असता - विदेह स्थितीत असता त्यांची सर्व काळजी सौजिजाबाई घेत असततुकोबांच्या परमार्थात जिजाबाईंचा फार मोठा वाटा होताशरीर कष्टवून परोपकारसंत वचनाचे पाठपाठांतरवाचणे विठ्ठलाचे नामस्मरण आणि चित्ताने विठोबाचे ध्यान अशी साधना अखंड चालू असता तुकोबांच्या स्वप्नात श्रीपंढरीराय नामदेवरायांना घेऊन आलेत्यांनी तुकोबांना जागे केले आणि जगत् उध्दाराकरितां कवित्व करण्याचे काम सांगितले.

कवित्वाची स्फूर्ती आणि जलदिव्य

नामदेवे केले स्वप्नामाजी जागे । सवे पांडुरंगे येऊनिया ॥१॥
सांगितले काम करावे कवित्व । वाउगे निमित्य बोलो नको ॥धृ॥
माप टाकी सळ धरिली विठ्ठले । थापटोनि केले सावधान ॥२॥
प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी । उरले शेवटी लावी तुका ॥३॥

द्याल ठाव तरि राहेन संगती । संतांचे पंगती पायांपाशीं ॥१॥
आवडीचा ठाव आलोंसे टाकून । आतां उदासीन न धरावे ॥धृ॥
सेवटील स्थळ निंच माझी वृत्ति । आधारे विश्रांती पावईन ॥२॥
नामदेवापायी तुक्या स्वप्नी भेटी । प्रसाद हा पोटी राहिलासे ॥३॥
तुकोबांचा स्वतःचा उध्दार झाला होता.आता त्यांना लोकोध्दार करावयाचा होता.त्यांना लाभलेला प्रसाद लोकांना वाटावयाचा होतापरमात्म्याचा संदेशनिरोप त्यांना घरोघर पोहोचावयाचा होता.
तुका म्हणे मज धाडिले निरोपा । मारग हा सोपा सुखरूप ॥

  तुकोबांना कवित्वाची स्फूर्ती झाली.
यावरी झाली कवित्वाची स्फूर्ती । पाय धरिले चित्ती विठोबाचे ॥
 आणि तुकोबांचे मुखातून अभंगगंगा वाहू लागलीसभाग्यश्रोते श्रवण करू लागले.
बोलावे म्हणून बोलतो उपाय । प्रवाहेचि जाये गंगाजळ ॥१॥
भाग्य योगे कोणा घडेल श्रवण । कैचे तेथे जन अधिकारी ॥२॥
तुकोबांच्या अभंगातून श्रुतीशास्त्राचे मथितमहाकाव्य फलार्थ निघू लागला.आळंदीत श्रीज्ञानदेव  महाराजांच्या महाद्वारात तुकोबा कीर्तन करीत असताही प्रासादिक अभंगवाणी महापंडित रामेश्वरभट्टजी यांच्या कानावर जाऊन आदळली.त्यांना धक्काच बसलाही गीताची किं मूर्तीमंतकिं नेणो श्रीमत् भागवत ॥ ही प्रत्यक्ष वेदवाणीच आणि ती प्राकृतातून आणि ती तुकोबाच्या मुखातून !
तुकयाचे कवित्व ऐकून कानी । अर्थ शोधूनि पाहाता मनी ।
म्हणे प्रत्यक्ष हे वेदवाणी । त्याचे मुखे कानी न ऐकावी ॥
तरी यासी निषेधावे । सर्वथा भय न धरावे ॥
रामेश्वरशास्त्रींनी निषेध केला ते म्हणाले तुम्ही शूद्र आहाततुमच्या अभंगवाणीतून वेदार्थ प्रगट होत आहेतुमचा तो अधिकार नाहीतुमच्या मुखाने तो ऐकणे हा अधर्म आहेतुम्हाला हा उद्योग कोणी सांगितला. तुकोबा म्हणालेही माझी वाणी नव्हेही देववाणी आहे.
करितो कवित्व म्हणाल हे कोणी । नव्हे माझी वाणी पदरीची ॥१॥
माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥२॥

नेणे अर्थ काही नव्हती माझे बोल । विनवितो कोपाल संत झणी ॥१॥
नव्हती माझे बोलबोले पांडुरंग । असे अंग संग व्यापुनिया ॥२॥
नामदेवराय आणि पंढरीराय स्वप्नात येऊन त्यांनी कवित्व करावयाची आज्ञा केली.
विप्र म्हणे आज्ञा कारण । श्रीची कैसे जाणेल जन ।
यालागी कवित्व बुडवून । टाकी नेऊन उदकात ॥१॥
तेथे साक्षात नारायण । आपे रक्षील जरी आपण ।
तरी सहजचि वेदाहून । मान्य होईल सर्वाशीं ॥१६॥
तुमचे कवित्व बुडवून टाकादेववाणी असेल तर देव तीच पाण्यात रक्षीलगावच्या पाटलाला रामेश्वरशास्त्रींनी तुकोबाच्या या अधर्माबद्दल कळविलेगावचा पाटील रागावलालोक खवळले.
काय खावे आता कोणीकडे जावे । गावात राहावे कोण्या बळे ॥१॥
कोपला पाटील गावचे हे लोक । आता घाली भीक कोण मज ॥धृ॥
तुकोबांनी अभंगाच्या सर्व वह्या घेतल्यादगड बांधून त्या इंद्रायणीच्या डोहात स्वहस्ते बुडविल्यापूर्वी खत-पत्रे प्रपंच बुडविलाआता अभंगाच्या वह्या-परमार्थ बुडविला.
बुडविल्या वह्या बैसिलो धरणे ॥
     तुकोबांना असह्य दुःख झाललोक निंदा करू लागलेकसला दृष्टांत आणि कसला प्रसाद सगळ थोतांडकसला देव आणि कसला धर्म तुकोबा महाद्वारात असलेल्या शिळेवर देवासमोर धरणे धरून बसलेप्राण पणाला लावलानिर्वाण मांडलेतेरा दिवस झालेदेव काही पावेना.
तेरा दिवस झाले निश्चक्र करिता । न पवसी अनंता मायबापा ॥
तुजवरी आता प्राण मी त्यजीन । हत्या मी घालीन पांडुरंगा॥
तुका म्हणे आता मांडिले निर्वाण । प्राण हा सांडीन तुज वरी ॥
इकडे रामेश्वरशास्त्री तुकोबांचा निषेध करून आळंदीहून निघाले ते नागझरीच्या उगमाजवळील पंचवटापाशी आलेते  तेथे असलेल्या सरोवरात स्नानाकरिता उतरले.स्नान करीत असता त्या सरोवरातील पाणी नेण्याकरिता अनगड सिध्द फकीर आला.आपण कोण कोठून आलात ? म्हणून त्याने विचारले असता त्याला पाहाताच शास्त्रीबुवांनी कानात बोटे  घालून बुडी मारली- (यावनी भाषा ऐकावयाची नाही म्हणूनया कृत्याने अनगड सिध्दास राग आला व त्यांनी शाप दिलारामेश्वरशास्त्री पाण्यातून बाहेर निघताच त्यांच्या अंगाचा दाह होऊं लागलाअंगाला ओले कपडे गुंडाळून फकिराच्या शापातून मुक्‍त होण्याकरिता शिष्या समवेत शास्त्री आळंदीला परतले व अजान वृक्षाखाली अनुष्ठान करीत बसले.
तो इकडे देहूस तेरावे रात्री भगवंताने सगुण बाळवेष धारण करून  तुकोबांना भेटलेआणि सांगितले कीआपल्या वह्यांचे मी पाण्यांत अठरा दिवस अहोरात्र उभे राहून रक्षण केले आहेत्या उद्या पाण्यावरती येतील.”  याप्रमाणे देहू गावच्या भाविक भक्‍तानाही दृष्टांत झालेदृष्टांताप्रमाणे ही सर्व भक्तमंडळी इंद्रायणीच्या डोहावर गेली.तो काय सर्व वह्या पाण्यावरती आल्या व तरंगू लागल्यापोहोणारांनी उडया टाकून त्या ऐल तीरावर आणल्यात्यांना पाण्याचा यत्किंचितही स्पर्श झाला नव्हता.सर्वांनी जयजयकार केलादेवाला आपण त्रास दिल्याबद्दल तुकोबांना फार खेद वाटला.
थोर अन्याय मी केला  तुझा अंत म्यां पाहिला ॥
जनाचिया बोलासाठी । चित्त क्षोभविले ॥१॥
उदकी राखीले कागद । चुकविला जनवाद ।
तुका म्हणे ब्रीद । साचे केलें आपुलें ॥
       तिकडे आळंदीला रामेश्वरशास्त्रींना ज्ञानदेव महाराजांनी सांगितले कीआपण तुकोबांची निंदानालस्ती केली त्याचे हे  फळ आहेतरी यावर आता एकच इलाज आपण तुकोबांकडे देहूला जा.”  रामेश्वरशास्त्री देहूला निघालेहे तुकोबांना समजले.तुकोबांनी आपल्या शिष्याजवळ शास्त्रीबुवाकरिता एक अभंग देऊन त्यास आळंदीला पाठविले तो अभंग रामेश्वरभटजींनी वाचताच त्यांचा दाह शांत झाला.
चित्त शुध्द तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र हे न खाती सर्प तया ॥
दुःख तें देईल सर्व सुखफळ । होतील शितळ अग्निज्वाळा ॥
रामेश्वर भटजी यासंबंधी आपला अनुभव सांगतात.
काही द्वेष त्याचा करिता अंतरी । व्यथा हे शरीरी बहू झाली ॥
म्हणे रामेश्वर त्याच्या समागमें । झाले हे आराम देह माझे ॥
       रामेश्वर भट तुकोबांच्या दर्शनास देहूस आले आणि कथा कीर्तने ऐकण्याकरिता देहूलाच राहिलेरामेश्वर भटांना शापमुक्त केल्याचे वर्तमान अनगडशाहाला कळलेत्याला विषाद वाटलातो तुकोबांचा छळ करण्याकरिता देहूस आलातुकोबांचे घरी गेलाकटोराभर भिक्षा मागितलीतुकोबांच्या कन्या हिने चिमूटभर पीठ कटोऱ्यात टाकताच तो पूर्ण भरून पीठ खाली सांडलेसिध्दाचे सामर्थ्य तुकोबांचे द्वारी लयाला गेलेअनगडशहा भक्‍तिभावाने तुकोबांना भेटले व तुकोबांचे जवळ भजन कीर्तन ऐकण्याकरिता राहिलेदार्शनिक ज्ञानपांडित्य ऋद्धी व सिद्धी , हरिभक्तीला शरण आल्याअसोवह्या तरल्याचे शुभवर्तमान देशोदेशी पसरलेवह्या तरल्याने लोकापवाद टळलाअभंगवाणी अविनाशी ठरलीपरमात्म्याचे सगुण दर्शन झाले तुकोबांच्या कथा कीर्तनाचा मार्ग मोकळा झाला.

तुकोबा आणि दोन संन्याशी
अवघा झाला रामराम । कोणी कर्म आचरेन ॥१॥
तुकोबांची कीर्तने नव्या जोमाने व उत्साहाने सुरू झालीतुकोबांचे लोकाध्दाराचे व जनता जागृतीचे साधन भजन कीर्तन.
तुका म्हणे केली साधना गाळणी । सुलभ कीर्तनी होऊनी ठेला ॥४॥
भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेचा पण प्रेमसुख लुटलेगोकुळच्या लोकांनीतुकोबांचा जन्म देहूचा पण भक्‍तीप्रेम सुख लुटले लोहगावच्या लोकांनीलोहगाव तुकोबांचे आजोळतुकोबांची कीर्तने नेहमी लोहगावला होत असावियीचीएकदा दोन संन्याशी तुकोबांच्या कीर्तनाला येऊन बसलेत्यांना काय दिसलेस्त्रीपुरुषकथा-कीर्तन मोठया तल्लीनतेने ऐकत आहेतलहान-थोरब्राह्मणशूद्र एकमेकांच्या पाया पडत आहेतभेदभाव नाहीसा झालेला आहेहे दृश्य पाहून त्यांनी तुकोबांची  निंदा करून ब्राह्मणाची निर्भत्सना केलीतुम्ही कर्म भ्रष्ट झालातकर्ममार्ग सोडून रामराम करत बसलातते तेथून निघालेकाखेतील मृगाजीन सावरत सावरत दाद मागण्याकरिता दादोजी कोंडदेवाकडे गेले.

काखे कडासन आड पडे । खडबड खडबड हुसकले ॥१॥
दाद करा दाद करा । फजीत खोरा लाज नाही ॥धृ॥

अवघा झाला रामराम । कोणी कर्म आचरेन ॥३॥
दाद करा दाद करा । फजीत खोरा लाज नाही ॥धृ॥

त्यांनी फिर्याद दिली की - लोहगावच्या ब्राह्मणांनी ब्रह्मकर्म सोडून दिले आहे ते शूद्राचे चरणी लागले आहेतआणि राम राम म्हणत आहेतअधर्म माजलेला आहे.तरी आपण याचे परिपत्य केले पाहिजे. दादोजींनी आपले सैनिक पाठवून ब्राह्मणांना १०० रुपये दंड केलातुकोबांना आणि लोहगावच्या लोकांना यावयास सांगितले.तुकोबा लोहगावच्या लोकांसह पुण्यास संगमावर आले व कीर्तन आरंभिलेतुकोबा आल्याचे समजतांच संपूर्ण पुण्य नगरी तुकोबांचे दर्शनास व कीर्तनास लोटली.दादोजीही निघालेदादोजीतुकोबांचे कीर्तन ऐकत बसलेसंन्याशीही बसले होते.त्यांना तुकोबा परमात्मा स्वरूप दिसू लागलेत्यांच्यावर एवढा प्रभाव पडला की,त्यांनी तुकोबांच्या चरणावर लोटांगण घातलदादोजींने त्यांना त्यांच्या कृत्याचा जाब विचारला कीब्राह्मण शूद्राच्या पाया पडतातअधर्म होतो अशी फिर्याद आपण देता आणि आपण पाया पडता हे काय? ते म्हणालेआम्हाला कीर्तनात तुकोबामध्ये नारायण दिसले स्वतः दादोजीने तुकोबांचा सत्कार केला आणि संन्याशांची फटफजिती करून त्यांना शहराबाहेर हाकलून दिले.
७. धरणेकरी
बीड परगण्याचा देशपांडे उतारवयांत त्याला वाटू लागले कीआपण पंडित व्हावे.या वयात पाठपाठांतर अभ्यास करून पंडित होण अशक्य म्हणून तो आळंदीला ज्ञानदेव  महाराजांच्या जवळ धरणे धरून बसलाज्ञानदेव  महाराजांनी त्याला सांगितलेबाबातू देहूला तुकोबांकडे जाकोर्ट सध्या तेथे आहे. त्याप्रमाणे तो देहूस आलाते समयी तुकोबांनी एकतीस अभंग केलेदेवाचा धांवा अभंग सात आणि उपदेश अभंग अकरा तुकोबांचा बोधविचारसरणीउपदेशाची पध्दत आणि तत्त्वज्ञान यांतून अभंगाच्या गटात साकल्याने पाहावयास मिळतेतुकोबांनी प्रथम देवाकडे धाव घेतलीदेवा तुम्हाला न सांगताहि अंतरातलं गुप्त कळू शकततेव्हा अभयदान देऊन आळीकराचे समाधान करा आणि आपली लाज आपण राखा.
न सांगता कळे अंतरीचे गुज । आता तुझी लाज तुज देवा ॥१॥
आळीकर त्यांचे करी समाधान । अभयाचे दान देऊनी ॥२॥
धरणेकऱ्यास उपदेश
    पोथ्यापुस्तक आणि ग्रंथ पाहण्याच्या भानगडीत आता पडू नकोताबडतोब तू आता हेच एक करदेवाकरिता देवाला आळवम्हातारपण आलेले आहे तेव्हा आता उशीर किती करावयाचा ?
देवाचिये चाडे आळवावे देवा । वोस देहभाव पाडोनियां ॥१॥
तू मनाला गोविंदाचा छंद लाव मग तूच गोविंद होशील.
गोविंद गोविंद । मना लागलिया छंद ॥
मग गोविंद ते काया । भेद नाही देवा तया ॥१॥
    सुखाने अन्न खा आणि परमात्म्याचे चिंतन करहरीकथा ही माउली आहे.आणि सुखाची समाधि आहेशिणलेल्याची साऊलीविश्रांति स्थान आहे.
सुखाची समाधि हरीकथा माऊली । विश्रांति साऊली शिणलियांची ॥१॥
  इतरांनी उपास करावाविठ्ठलाचे दासाने चिंता झुगारून द्यावीआमच्या अंगात सगळे बळ आले आहेतुकोबांनी हा बहुमोल उपदेश त्या धरणेकऱ्यास केला त्याने मूर्खपणाने काय केल-
देवाचे उचित एकादश अभंग । महाफळ त्याग करोनि गेला ॥
८. छत्रपती शिवाजी आणि तुकोबा
    तुकोबाची कीर्ती शिवाजी राजे यांच्या कानावर गेलीत्यांनी तुकोबांना दिवटया,छत्री घोडे आणि जडजवाहीर सेवकाबरोबर पाठवून दिलेतुकोबांनी त्याचा स्वीकार केला नाहीसोबत चार अभंगांचे पत्र देऊन तो नजराणा  शिवाजी राजांकडे परत पाठविलाते देवास म्हणाले,
नावडे जे चित्ता । ते तू होशी पुरविता ॥१॥
     दिवटयाछत्री, घोडे ही काही मला फायद्यात पडणारी नाहीत (किंवा ह्यांच्यांत मी पडणारा नव्हेदेवा तूं मला यात कशाला गुंतवतोसतुकोबांच्या ह्या निरपेक्षतेच शिवाजी राजे यांना आश्चर्य वाटलं व ते स्वतः तुकोबांचे भेटीला वस्त्रे,  भूषणे,अलंकारमोहरा घेऊन सेवकासह लोहगावला आलेते राजद्रव्य पाहून तुकोबा म्हणाले -
काय दिला ठेवा । आम्हा विठ्ठलचि व्हावा ॥१॥
तुम्ही कळले ती उदार । साठी परिसाची गार ॥२॥
तुका म्हणे धन । आम्हा गोमांसासमान ॥३॥
  मुंगी आणि राव आम्हाला दोन्ही सारखेच आहेत्याचप्रमाणे सोने आणि माती ही आम्हाला समानच वाटते.
मुंगी आणि राव । आम्हा समानचि जीव ॥१॥
सोने आणी माती । आम्हा समानचि चित्ती ॥२॥
आम्ही या गोष्टीने सुखी होणार नाहीत तर आपण देवाचे नाव घ्याश्रीहरीचे सेवक म्हणवा.
आम्ही तेणे सुखी । म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी ॥१॥
म्हणवा हरिचे दास । तुका म्हणे मज हे आस ॥२॥
तुकोबांच्या उपदेशांनी प्रभावित होऊन राजांनी राज्यच सोडून दिले आणि तुकोबांचे भजन कीर्तन श्रवण करू लागलेतेव्हा तुकोबांनी त्यांना आणि त्यांच्या सेवकांना क्षात्र धर्म सांगीतला :
आम्ही जगाला उपदेश करावा । आपण क्षात्रधर्म सांभाळावा ॥
भांडण पडले असता सेवकांनी स्वामीच्या पुढे व्हावे ।
स्वामीपुढें व्हावें पडतां भांडण ॥
   गोळयाबाण यांचा वर्षाव होत असतां सैनिकांनी तो सहन करावाआपले संरक्षण करून शत्रूला फसवावेआणि त्याचे सगळे हिरून घ्यावेशत्रूला आपला माग लागूं देऊ नयेआपण स्वामीकरिता जीवावर उदार असावेअसे ज्याचे सैनिक-सेवक आहेत तोच त्रैलोक्यांतील सामर्थ्यवान राजा होय.
तुकोबांनी शिवाजी राजे यांना आशीर्वाद देऊन निरोप दिलाराजे आणि सैनिक यांनी तुकोबांचा उपदेश चित्तात धरलाप्रत्यक्ष कृतीत उतरवलातुकोबांच्या आशीर्वादाने ते सामर्थ्य संपन्न महाराजे झाले.
९. तुकोबांचा बोध उपदेश शिकवण
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव । आपणचि देव होय गुरु ॥१॥
   ज्ञानमार्गात गुरुची महती विशेष भक्‍तिमार्गात तितकी नाही.
  मेघवृष्टीने करावा उपदेश । परि गुरुने न करावा शिष्य  ॥
   या विचारसरणीचे तुकोबाअद्वैत शास्त्राची तुकोबांना मुळीच आवड नसे.
अद्वैताची वाणी । नाही ऐकत मी कानी ॥१॥
  तुकोबांचे सगुणावर प्रेम विशेषयामुळे महाराज श्रीगुरूस शरण गेले नाहीत.
अद्वैतशास्त्र नावडे यासी । यास्तव शरण न जाय सद्‍गुरुशी ॥
पुढे वाट पडेल ऐसी । गुरु भक्तीशी अवरोध ॥
एक श्रेष्ठ आचरला जैसे । जन पाहोनि वर्तती तैसे ॥
तरी आपण धरूनि विप्रवेश । द्यावा तुकयासी अनुग्रह ॥
स्वप्नामध्ये तुकोबा इंद्रायणीचे स्नान करून देवळात जात असता त्यांनी रस्त्यातएक ब्राह्यण पाहिला व त्याला नमस्कार केलाब्राह्मणाने संतुष्ट होऊन तुकोबांच्यामस्तकावर हात ठेवला व रामकृष्ण हरि मंत्र दिलाआपली परंपरा सांगितलीमाघ शुध्द दशमीस गुरूवारी ही घटना घडली.
सापडविले वाटे जात गंगास्नाना । मस्तकी तो जाणा ठेविला कर ॥२॥
राघव चैतन्य केशव चैतन्य । सांगितली खुण मालिकेची ॥४॥
बाबाजी आपुले सांगितले नाम । मंत्र दिला रामकृष्ण हरि ॥
माघ शुध्द दशमी पाहोनि गुरुवार । केला अंगीकार तुका म्हणे ॥६॥
तुकोबांनी स्वतः कोणापाशी मंत्राची याचना केली नाहीते म्हणतात
नाही म्या वंचिला मत्र कोणापाशी । राहिलो जिवाशी धरोनिया ॥१॥
तुकोबा म्हणतातमला कान फुंकण्याचे माहीत नाही व मजजवळ एकांतीचे ज्ञान नाहीपण जो देव कोणी डोळयांनी पाहिला नाही तो आम्ही दाखवू.
नेणो फुंको कान । नाही एकांतीचे ज्ञान ॥२॥
नाही देखिला तो डोळा । देव दाखवू ते कळा ॥३॥
प्रपंचामध्ये प्रभूचे अधिष्ठान असल्याखेरीज देव आपलासा केल्याखेरीज जीवांना सुख होणार नाही.
आपुला तो एक देव करोनी घ्यावा । तेणे विन जीवा सुख नोहे ॥२॥
तुम्ही माझा अनुभव पाहा
माझा पहा अनुभव । केला देव आपुला ॥१॥
बोलवले तेची द्यावे । उत्तर व्हावे ते काळी ॥२॥
हा अनुभव कशाचा म्हणाल तर-
हा गे माझा अनुभव । भक्तीभाव भाग्याचा ॥१॥
ऋणी केला नारायण । नोहे क्षण वेगळा ॥२॥
   दैवाच्या लीलेने तुकोबांचा संसार रसातळाला नेला.देवाच्या लीलेने तुकोबानी गौरीशंकर गाठलदैव अनिर्बंध आहे त्याला कशाचेही बंधन नाहीदेवाला बंधन आहे कशाच तर प्रेमाच.
प्रेमसूत्र दोरी । नेतो तिकडे जातो हरी ॥१॥
ते प्रभू प्रेम स्मरणाने मिळते.
आम्ही घ्यावे तुझे नाम । तुम्ही आम्हा द्यावे प्रेम ॥
  संताच्या गावीही प्रेमाचा सुकाळ असतो.
संताचिये गावी प्रेमाचा सुकाळ । नाही तळमळ दुःख लेश ॥१॥
संताच्या व्यापारातउपदेशाच्या पेठेत प्रेमसुखाची देवाणघेवाण चाललेली असते.
संतांचा व्यापार उपदेशाची पेठ । प्रेमसुखासाठी देती घेती ॥
  येऱ्हवी हे भक्‍ती प्रेमसुख काय आहेहे पंडितांनाज्ञानियांनामुक्‍तांना माहितही नाही आणि कळत नाही.
भक्ति प्रेम सुख नेणवे आणिका । पंडिता वाचका ज्ञानियासी ॥
या प्रेमाने समाज सांधला जाईलप्रेमाच्या बंधनाने समाज बांधला जातोप्रेमात सर्व भेद-आपपरभाव नाहीसे होतातप्रेमानें जीवन सुखी समृध्द होतेंअसें हें दिव्य दैवी प्रेम प्रभुस्मरणानें मिळेलसंताचे सान्निध्यात मिळेल.प्रेमात दुःखाचे रूपांतर सुखांत होईलमनुष्य जीवन संपूर्ण पालटून जाईल.
उपदेश
उपदेश तो भलत्या हाती । झाला किती धरावा ॥
आता तरी पुढे हाची उपदेश । नका करू नाश आयुष्याचा ॥
मोलाचे आयुष्य जाते हातोहात । विचारी पाहात लवलाही ॥
गात जातो तुका । हाचि उपदेश लोका ॥
तुका म्हणे हित होय तो व्यापार । करा काय फार शिकवावे ॥
आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिये ॥
कुळी कन्या पुत्र होती जे सात्त्वि । तयाचा हरीख वाटे देवा ॥
गीता भागवत करीती श्रवण । अखंड चिंतन विठोबाचे ॥
हित ते करावे देवाचे चिंतन । करोनियां मन शुध्द भावे ॥
तुका म्हणे फार । थोडा तरी उपकार ॥
संतसंग
संग न करावा दुर्जनांचा । करी संतांचा सायास ॥
पतन उध्दार संतांचा महिमा । त्यजावे अधमा संत सेवी ॥
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदासे विचारे वेच करी ॥
  तुकोबांची शिकवण सुविचाराचीसदाचाराची आणि समतेची होतीप्राणिमात्राचे कल्याण होण्याकरिता ते कोणाची भीडभाड ठेवीत नसत.
नाही भिडभाड । तुका म्हणे सानाथोर ॥
तीक्ष्ण उत्तरे । हाती घेऊनि बाण फिरे ॥
तुका म्हणे लासू फासू देऊ डाव । सुखाचा उपाय पुढे आहे ॥
१०.  तुकोबांचे ध्रृपदेटाळकरीअनुयायी व शिष्य
तुकोबांचे मुख्य धृपदे टाळकरी १४ होते म्हणून महीपतीबाबाने त्याचा बऱ्याच ठिकाणी उल्लेख केलेला आहेतुकोबांचे कीर्तनात हे ध्रृपद धरीत.
महादजीपंत कुलकर्णी देहू गावचे कुलकर्णी याचा उल्लेख बहिणाबाईचे गाथेतही  
   आलेला आहे देवालयाच्या बांधकामावर यांची देखरेख होती.
. गंगाधरबाबा मवाळ - (तळेगाव), अभंग लेखकहे तुकोबाचे सेवेस लागल्याचा    
   कागदोपत्री उल्लेख आहे.     
. संताजी तेली जगनाडे - (चाकणकर) - तुकोबाचे अभंग लेखक.
. तुकया बंधू कान्होबा.      
मालजी गाडे, (येलवाडी) - तुकोबांचे जामात.
. कोंडोपंत लोहकरे लोहगाव.
गवार शेट वाणी सुदुंबरे.
  मल्हारपंत कुलकर्णी चिखली.  
  .    आबाजीपंत लोहगावकर.
  १०.रामेश्वरभट्ट बहुळकर.
  ११.कोंडपाटीललोहगाव.
  १२.नावजी माळी लोहगाव.
  १३.शिवबा कासार लोहगाव.
  १४.सोनबा ठाकूर कीर्तनांत मृदंग वाजवीत असत.
तुकोबांची शिष्या बहिणाबाई यांना तुकोबांचा स्वप्नात उपदेश झालात्या देहूस दर्शनाकरिता आल्याकवित्वस्फूर्ती बाईंना देहूस झालीबहिणाबाईंनी तुकोबाची कथा कीर्तने प्रत्यक्षांत ऐकलीमंबाजीकडून यांना बराच त्रास पोहोचलाबहिणाबाईंची योग्यता अधिकार तुकोबाचे खालोखाल होताबहिणाबाईंची अभंगाची गाथा एकदा तरी वाचून पाहावीच.
११. प्रयाण
    कार्तिक वद्य एकादशीला आळंदीस ज्ञानदेव  महाराजांचे पुढे तुकोबाचे कीर्तन चालले होतेयात्रा अपार होतीकीर्तनाचा अभंग होता.
भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग । ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तनू ॥१॥
   शरीर कोठे ब्रह्म होईल कायकोणी केले आहे कायअसे आत्मानात्म विचारकर्तेज्ञानी जे श्रोते होते त्यांनी तुकोबाला विचारलेतुकोबा म्हणालेमी करून दाखवीन.
घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्याहाती । मुक्ता आत्मस्थिती सांडवीन ॥
ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी । भाग्य तरी ऋणी देवा ऐसा ॥
     लोहगावला तुकोबांचे कीर्तन चालू असताना परचक्र येऊन लोहगाव लुटले.तुकोबांनी देवाचा धावा केला.
न देखवे डोळा ऐसा हा आकांत । परपीडे चित्त दुःखी होते ॥१॥
देव ताबडतोब पावले नाहीततुकोबांनी देवाला सांगितले.
तुज भक्ताची आण देवा । जरी तुका येथे ठेवा ॥१॥
तिसरी गोष्ट ज्ञानदेव  महाराजांनी तुकोबांची अपार सेवा केली त्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरिता ज्ञानदेव  महाराज जिजाईचे पोटी आलेतुकोबाने ओळखले की,देव सेवा करू पाहातात हे बरें नव्हे आपणच येऊन जावे सर्वाची विचारपूस केली,सर्वाना सांगितलेआम्ही वैकुंठाला जात आहोततुम्ही माझ्याबरोबर वैकुंठाला चलाकोणी तयार झाले नाहीमहाराज सर्वासमवेत इंद्रायणीच्या काठी आले तेथे नांदुरुखीचे वृक्षाखाली कीर्तनास आरंभ केला१४ टाळकऱ्यांनी क्षेमालिंगन दिले तुकोबांचे चिरंजीव महादेव विठोबा पुढे आले त्यांनी तुकोबांना नमस्कार केला.तुकोबांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवलाजिजाबाईकडे कौतुकाने पाहिलेसगळयांना सांगितले-
सकळही माझी बोळवण करा । परतोनि घरा जावे तुम्ही ॥
वाढवेळ झाला उभा पांडुरंगा । वैकुंठा श्रीरंग बोलावतो ॥
आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी ॥
अंतःकाळी विठो आम्हांसी पावला । कुडीसहित झाला गुप्त तुका ॥२॥
    भगवत्‌कथा करीत असता तुकोबा अदृश्य झालेयाचा उल्लेख राज्याभिषेक शके ३० च्या सनदेत आहे. श्री तुकोबा गोसावी सत्पुरुष हे मौजे देहू ता. हवेली जि. पुणेयेथे भागवत कथा करीत असता अदृश्य झाले हे गोष्ट विख्यात आहे.रा.तुकोबा गोसावी हे बहुत थोर सत्पुरुष होते. इ.स.१७०४ च्या देहूगावची सनद. सनद रामचंद्र नीळकंठ अमात्यांचे हातची आहे.रामचंद्र पंत छत्रपती शिवाजी राजे यांच्या अष्टप्रधानमंडळातील अमात्य या पदावरील एक प्रधान होते.

शके पंधराशे एकाहत्तरी । विरोधी नाम संवत्सरी ।
फाल्गुन वद्य द्वितीया सोमवारी । प्रथम प्रहरि प्रयाण केले ॥२॥
तुकोबा गोसावी वैकुंठास गेलेस्वदेहीनिशी गेले बाळोजी तेली जगनाडे वही,पृ२१६, संताजींच्या वहीची नक्कलसंताजी प्रयाण समयी प्रत्यक्ष हजर होते.
    तुकोबांच्या गुप्त होण्याने सर्वत्र मंडळी शोकसागरात बुडालीतुकोबांची मुलेबंधू,अनुयायी तेथेच बसून राहिलेपंचमीला तुकोबांचे टाळपत्रकथा आकाशमार्गे आली.रामेश्वरशास्त्रींनी निर्णय दिलातुकोबा सदेह वैकुंठाला गेलेसर्वानी स्नाने उरकली.तुकोबांची मुलेबंधू कान्होबा देवाशी भांडलेदेवा तू माझ्या बंधूला आणून दे.वैकुंठाला नेऊ नकोस. देवाने कान्होबाचे समाधान केले.
१२. तुकोबांच्या पश्चात्‌
तुकोबा देहासह वैकुंठास गेल्याचे वर्तमान ऐकून शिवाजीराजे विस्मय पावलेतेव्हा त्यांनी देहू येथील जानोजी भोसले याच्याजवळ तुकोबांच्या कुटुंबियांची विचारपूस केली व तुकोबांचे वडील पुत्र महादेवबुवा यांना भेटी घेऊन येण्याविषयीची आज्ञा केलीजानोजी भोसले महादेव बाबास घेऊन शिवाजी राजे यांचेकडे गेलेशिवाजी राजे यांनी महादेवबाबास वर्षासन एक खंडी धान्य व लुगडयाकरितां एक होनाची सनद करून दिली. संभाजी राजे यांनी हे वर्षासन पुढे चालू ठेवले.
तुकोबांचे वैकुंठ गमनानंतर नारायण महाराजांचा जन्म झालानारायण महाराज ज्ञानदेव  महाराजांचे अवतार असल्यामुळे दोघे वडील बंधू महादेवबुवा विठोबा नारायणरावांच्या आज्ञेत असतमातोश्री असेपर्यत एकत्र होतेमातोश्रीचा काल जाहल्यावर विठ्ठलबुवानारायणबुवाजिजाबाईंच्या अस्थी घेऊन महायात्रेला गेले.महादेवबुवा श्री विठ्ठलदेवाची पूजाअर्चा नित्य नियम सांभाळून होतेमहादेवबाबांनी तुकोबांचे अभंग लिहिले आहेतनारायणबाबा प्रथम सरंजामी सरदारी थाटाने राहू लागलेत्यांचे भेटीस संताजी पवार आलेत्यांनीं नारायणबाबास धिःकारलेबाबांनी घर ब्राह्मणाकडून लुटविलेतपश्चर्या केलीअरण्यवास पत्करलाविठोबाचें भव्य देऊळ बांधलें.
तुकाराम तो आधीच गेले होते वैकुंठा ।बहु दिवसांनी मग वैराग्य झालें नीळकंठा ॥१॥
तुकयाचा नंदन मागे नारायणबाबा ।दर्शन त्याचे घेऊनि म्हणती सुसंग लाभावा ॥२॥
निळोबा गोसावी पिंपळनेरकर बाबांच्या दर्शनास आलेबाबांनी त्यांना साद्यंत तुकोबांचे चरित्र सांगितलें निळोबांना घेऊन ते तीर्थयात्रेला गेलेनिळोबांनी तुकोबांचे भेटीकरिता ४२ दिवसाचे निर्वाण मांडलेतुकोबा भेटले.
येऊनियां कृपावंते । तुकया स्वामी सदगुरूनाथें ॥१॥
हात ठेविला मस्तकीं । देऊनी प्रसाद केले सुखी ॥२॥
निळोबांना कवित्वाची स्फूर्ती झालीत्यांनीही अनेक अभंग केलेतनारायणबाबा थोर तपस्वी हरिभक्त म्हणून सनदा पत्रात उल्लेख आढळतोबाबांच्या दर्शनास तडीतापडी संन्याशीयात्री येऊ लागलेबीजेचा महोत्सव होऊं लागलात्यांना बाबांना अन्नदान करावे लागेत्याकरिता इ१६९१ मध्ये छत्रपति राजाराम महाराजांनी नारायणबाबांना येलवाडी गांव इनाम दिलापुढे देहू किन्हई ही गांवे देवाच्या महोत्सवाकरिता पूजा-अर्चाअन्नछत्राकरितां बाबांना छत्रपती दुसरे शिवाजी आणि शाहू महाराज यांचेकडून मिळालीशाहू महाराज आणि राणी सरवारबाई बाबांना गुरूचे ठिकाणी मानीत असतनारायण महाराजांनी तुकोबांची पालखी सोहळा आषाढी वारीस सुरू केलाबाबांनीं देवस्थान नांवारूपास आणलेसांप्रदाय वाढविलाऔरंगजेबाचा तळ महाराष्ट्रात पडला असता पंढरपूरच्या आणि शिंगणापूरच्या यात्रेकरूना होणारा उपद्रव थांबविलाबाबा शके १६४५ श्रावण शुध्द चतुर्थीस वैकुंठवासी झालेत्यांच्या अस्थी घेऊन महादेवबाबांचे चिरंजीव आबाजी बाबा काशीयात्रेस गेले.
  गंगोदकाची कावड घेऊन आबाजीबाबा देहूस आलेदरम्यान विठ्ठलबाबांचे चिरंजीव उध्दवबाबा हे या मयी शाहू तुकोबांच्याजवळ होतेते देहूस आलेत्यांनी देवस्थान संस्थानचा कारभार हाती घेतलाआबाजीबाबांचे ताब्यात देवस्थाने ते देईनातआबाजी बाबा हेही वैराग्यसंपन्न तपस्वी हरिभक्ती रत होतेआबाजीबाबा नंतर त्यांचे चिरंजीव महादेवबाबा हेहि देवस्थान संस्थानाकरितां भांडलेभांडण वडीलपणाचदेवाकरिता होतसंस्थानाकरिता  नव्हतसरकारने विशेष लक्ष घातले नाहीतेव्हा महादेवबाबा देहू सोडून देवाकरिता संप्रदायाकरिता पंढरपूरला येऊन राहिलेक्‍त देवाकडे आलेयांनी तुकोबांच्या अभंगाचे संकलन करून गाथा तयार केलीदेहूकरांच्या फडाची परंपरा चालविलीत्यांचे चिरंजीव वासुदेव महाराज देहूकर यांनी पंढरीच्या ठिकाणी वारकरी सांप्रदायाचे कार्य भरीव असे केले व त्यांचेंच वेळी अनेक लहानमोठे फड नांवारूपास आले व वारकरी पंथाची परंपरा अधिकाधिक वाढू लागलीकर्नाटकापर्यंत संप्रदाय वाढविलात्यांचे चिरंजीव वासुदेवबाबा यांनी फड नावारूपास आणला तुकोबाचे पणतू गोपाळबुवा हेहि साक्षात्कारी होते.
तुकोबांचें चरित्र लिहिलेहे त्यांचे महान कार्य होयदेहू संस्थानने घराण्याची आषाढी कार्तिकीची पंढरपूरच्या वारीचा पालखी सोहळा आजतागायत अखंड चालू ठेवलादेहूकर मंडळीनी गावोगावी कथाकीर्तने करून वारकरी संप्रदाय वाढविला.संप्रदायाची व कुलदेवतेची अमोल सेवा केलीआजही सर्वजण,
अमृताची फळे अमृताचे वेली । तेची पुढे चाली बीजाचिहि ॥१॥
हे तुकोबांचे वचन सार्थ करून दाखवीत आहेत.

श्रीधर देहूकर
श्रीतुकाराम जन्मस्थान,
श्रीक्षेत्र देहू ४१२१०९.